रामटेकडी जवळ कचरा डेपोला आग, 11 गाड्या घटनास्थळी दाखल



पुणे : सहकारनामा

पुण्याजवळ असणाऱ्या रामटेकडी नजीक  कचरा डेपोला भीषण आग लागली असून हि आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या दाखल झाल्या आहेत. पोलीस दाखल झाले आहेत. सुदैवाने या आगीत जिवीत हानी झाली नाही.

पुणे जवळ हडपसर-रामटेकडी येथे औद्योगिक वसाहतीचा कचरा प्रकल्प आहे. या कचरा प्रकल्पाला पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून तिने रौद्ररूप धारण केल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे. या आगीनंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाची 11 फायर फायटर वाहने पाठवण्यात आली. सध्या आग भडकलेलीच तिला आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.