Sucide : गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या



हवेली : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

कोरेगाव मूळ (ता. हवेली ) येथे एका चोवीस वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजण्याचा सुमारास उघडकीस आली आहे. उमेश मतरू मडावी (वय- २४, रा. कोरेगाव मूळ ता. हवेली, मूळ रा. आंबेझरी, ता. कुरखेडा, जिल्हा गडचिरोली) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. 

याप्रकरणी दिलीप फागुजी हारमी (वय-२८ रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली, मूळ रा. आंधळी ता.कुरखेडा, जि. गडचिरोली ) यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप हारामी हे कोरेगाव मूळ येथील महेश सिताराम शिंदे यांच्या बोअरच्या गाडीवर कामगार म्हणून काम करतात. दिलीप हारामी यांच्या समवेत उमेश रामजी होडी, विजय परशुराम तुलावी, अमित चमरू केरामी, उमेश मतरू मडावी, अनिल मोहन मंडावी (रा. सर्वजण आंबेझरी, ता. कुरखेडा, जिल्हा गडचिरोली) हे सर्वजण काम करतात.  

मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनिल मंडावी याने झोपेतून उठवून संगितले की, उमेश मतरू मडावी याने पार्किंगमध्ये असलेल्या जंगली झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला आहे. त्यानुसार बोअरगाडी मालक महेश शिंदे व दिलीप हारामी यांनी जाऊन पाहणी केली. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी तपास पोलिस हवालदार सोमनाथ चितारे करीत आहेत.