श्रीराम मंदिर उभारणीसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने 21 लाखांचा धनादेश



लोणी काळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

 “श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखालील मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, व चिंचवडच्या वतीने २१ लाख रुपयांचा धनादेश श्रीराम मंदिराचे मुख्य विश्वस्त स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद तांबे यांनी दिली. 

यावेळी मुख्य विश्वस्त  मंदार महाराज देव, विश्रामजी देव, ऍड, राजेंद्र उमाप, विनोदजी पवार, आदि मान्यवर उपस्थित होते. 

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाचे अभियान संपूर्ण देशभर सुरू आहे. या अभियानाला संपूर्ण देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १५ जानेवारीला सुरुवात झालेले देशव्यापी अभियान हे २७ फेब्रुवारीपर्यंत सूरु राहणार आहे. 

देशातील बारा कोटी कुटुंबाशी संपर्क साधण्याचे उद्दिष्ट  ठेवण्यात आले आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये, आणि 1000 रुपये अशा स्वरूपात निधी संकलित केला जात आहे.