पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

दौंड : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडिसीसी) बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी दौंड येथील अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड करण्यात आली आहे. 

अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड झाल्यानंतर दौंड चे माजी नगराध्यक्ष तथा भीमथडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रेमसूख कटारिया, माजी नगराध्यक्ष ॲड. अमोल काळे, जावेद सय्यद यांच्याकडून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडिसीसी) बँक ही आशिया खंडामध्ये नावाजलेली बँक आहे. या बँकेचा मोठा विस्तार आहे. शेतकरी आणि व्यवसायिकांना कर्ज देण्यामध्ये तसेच वसुलीमध्ये ही बँक अग्रेसर आहे. या बँकेकडून कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची नियुक्ती करण्यात आल्याने अ‍ॅड.शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.