LCB कडून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस, एक आरोपी जेरबंद



पुणे : सहकारनामा

लोणी काळभोर गु.र.नं 96/2021 भादवी कलम 392, 34 नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात अज्ञात 3 इस्मानी मोटार सायकल वरून येऊन फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. यावेळी त्या इसमांनी त्याजवळील एक ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि रोख 2000 रु ची रक्कम चोरून नेली होती. सदरच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना मिळालेल्या माहिती वरून गणेश उर्फ आबा मधुकर माने (वय 19 वर्षे रा मोरे वस्ती कोरेगाव मूळ ता हवेली जि पुणे) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने त्याचे इतर 2 साथीदार यांचे मार्फत केले असल्याचे सांगितले आहे. 



सदर आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास साठी लोणी काळभोर पोलिस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरील कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट सो यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरीक्षक शिवाजी ननावरे, पो उप निरीक्षक राम धोंडगे, पो हवा उमाकांत कुंजीर, पो ना राजू मोमिन, पो कॉ धिरज जाधव, पो कॉ दगडू वीरकर यांनी केली आहे.