यवत च्या चोरट्याकडून दौंडमध्ये घरफोडी | चोरटा जेरबंद, 7 लाख 20 हजारांचे दागिने हस्तगत

अख्तर काझी

दौंड : शहरातील भवानीनगर येथे राहणाऱ्या वैशाली संदीप वाघमोडे यांच्या घरातून चोरट्याने 7 लाख 20 हजार रुपये किंमतीचे तब्बल 17 तोळे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेले होते. दि.1 ऑगस्ट 2024 रोजी याप्रकरणी दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दौंड चे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण व पोलीस पथकाने सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. दि. 19 ऑगस्ट रोजी या गुन्ह्यामध्ये चैतन्य संजय शिंदे (वय 22, रा. दोरगेवाडी, यवत, ता. दौंड) यास अटक करण्यात आली होती. आरोपीस न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असता तपासामध्ये आरोपीकडून चोरीस गेलेले 17 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आ. राहुल कुल यांच्या योजनेचा बोलबाला

सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष डोके, पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण, सहा. पोलीस फौजदार पांडुरंग थोरात, पोलिस हवालदार एस.डी गुजर, नितीन बोराडे निखिल जाधव, अमीर शेख, पांढरे, पो.कॉ. संजय कोठावळे, पवन माने या पथकाने केली.