वाखारीच्या शेळकेवस्ती जवळ ट्रक-कारमध्ये भिषण अपघात, पत्नी जागीच ठार तर पती गंभीर

दौंड : दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर हायवेवर आज दि. 5 जुलै रोजी सायंकाळी 5:00 वाजता वाखारी गावाजवळ ट्रक आणि वॅगन आर वाहनामध्ये भिषण अपघात होऊन यात वॅगन आर कार मधील महिला जागीच ठार झाली आहे तर तीचा पती गंभीर जखमी झाला आहे. याबाबत व्ही.डी कापरे (पोलीस नाईक ब.नं-2344 नेमणुक यवत पोलीस स्टेशन) यांनी खबर दिली आहे.

पुणे सोलापूर हायवेवर असणाऱ्या वाखारी गावाच्या शेळकेवस्ती जवळ (हॉटेल नव निर्मान) बल्कर ट्रक क्र. MH 12/VF/2401 आणि सोलापुर बाजुकडुन येणारी वॅगनर कार नं MH 12/QG/5726 यांच्यामध्ये समोरा समोर भिषण अपघात झाला. गयावेळी वॅगन आर कारवरील चालक शिलवंत शांतकुमार गायकवाड (वय 45 वर्षे रा.हातोसी ता.निलंगा जि.लातुर) हे गंभीर जखमी झाले तर त्यांच्याबरोबर असणारी त्यांची पत्नी सारिका शिलवंत गायकवाड (वय 40 वर्षे) हिस गंभीर दुखापती होवुन ती जागीच ठार झाली.

अपघाताबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई मटाले हे करीत आहेत.