दौंड : भारतीय जनता पार्टीच्या दौंड तालुका युवती आघाडीच्या अध्यक्षपदी अफ्रिन पानसरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांच्याकडून देण्यात आले आहे.
अफ्रिन पानसरे ह्या केडगाव (आंबेगाव) येथील रहिवासी असून त्यांनी या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या बारामती लोकसभा विभागीय महिला अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. अफ्रिन पानसरे यांच्या निवडीनंतर त्यांना दौंड चे आमदार राहुल कुल, भाजप तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे यांनी शुभेच्छा दिल्या.
पक्ष श्रेष्ठी आणि आमदार, पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आपण काम करणार असल्याचे यावेळी पानसरे यांनी म्हटले आहे.