दौंड शहराला आज दिलासा, 71 पैकी शहरातील फक्त 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, मात्र परिसरातही 3 जण बाधित



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दौंड शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या रोजच वाढत होती. आज मात्र कोरोनाने दौंड करांना थोडासा दिलासा दिल्याचे दिसते आहे.आज आलेल्या अहवाला नुसार शहरातील फक्त तीन जणांना संसर्गाची लागण झाली असून 65 व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे. 

दि. 29 रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व परिसरातील 71 संशयितांची  तपासणी करण्यात आली होती, त्यापैकी 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 25 ते 47 वर्ष वयोगटातील 2 महिला व 4 पुरुष रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.

बाधित रुग्णांमध्ये शहरातील भवानीनगर- 01, राज्य राखीव पोलीस दलातील 02 जवान तसेच ग्रामीण भागातील 3 रुग्णांचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.