दौंड ग्रामिण’मध्येही कोरोनाने टाकली मान, आज 61 पैकी इतकेजन निगेटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये फैलावत चाललेल्या कोरोना व्हायरसला आता पायबंद बसू लागला आहे.

दौंड शहरापाठोपाठ दौंड ग्रामिणमध्येही दिलासादायक रिझल्ट येऊ लागले असून आज दि. 12 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालामध्ये 61 पैकी 57 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 4 जणांचे अहवाल पेंडिंग आहेत.

परवा सोमवारीही 4 जणांचे अहवाल पेंडिंग होते त्यापैकी सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले असल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.