मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याचा परिणाम देशात आणि राज्यातही जाणवत आहे त्यामुळे सध्या लॉकडाऊन सारखा उपाय करून कोरोनाला आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय आता राज्य सरकारने 31 मे पर्यंत वाढवण्याबाबत निर्णय घेतला असून त्याबाबत मुख्य सचिवांनी आदेश पारित केले आहेत. याबाबत ANI या वृत्तसंस्थेने आदेशाची एक नक्कल ट्विट केली असून आता लॉकडाऊनमध्ये 31 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
ANI (@ANI) Tweeted: Government of Maharashtra extends lockdown till May 31