दौंड : दौंड तालुक्यातील पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दौंड तालुक्यात १९७६ पूर्वीच्या वीर बाजी पासलकर, पानशेत धरण प्रकल्पाचे पुनर्वसन झालेल्या गावांची संख्या सुमारे ४० असून त्या गावातील नागरिकांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे विनंती केली होती. त्यानुसार तालुक्यातील गावांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आला आहे. यामुळे या गावामध्ये अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटर, स्मशानभूमी सुधारणा, समाजमंदिर, पाण्याची टाकी आदी कामे केली जाणार आहेत.
गावनुसार मिळालेला निधी पुढील प्रमाणे – पाटस – ३ कोटी ७० लाख, नानविज – २ कोटी ४६ लाख, गार – २ कोटी १५ लाख, पारगाव – १ कोटी ७० लाख, कानगाव – १ कोटी ५६ लाख, गिरिम – १ कोटी ५५ लाख, राजेगाव १ कोटी ५२ लाख, सोनवडी – १ कोटी ४० लाख, पिंपळगाव – १ कोटी १४ लाख, मलठण – ९७ लाख, राजेगाव – ८३ लाख, दौंड – ७७ लाख, पेडगाव – ७६ लाख, वरवंड – ६९ लाख, केडगाव – ६३ लाख, हिंगणीबेर्डी – ५३ लाख, लिंगाळी – ५२ लाख, उंडवडी – ५२ लाख, राजेगाव – ४५ लाख, वाटलुज – ३६ लाख, कासुर्डी – २७ लाख, खामगाव – २६ लाख, दापोडी – २२ लाख, देऊळगावराजे – १३ लाख अशा प्रकारे निधी मंजूर झाला आहे.
मंजूर करण्यात आलेली हि सर्व कामे लवकरच सुरु होतील व नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे.