17 मे पर्यंत लॉकडाउन वाढले!



वृत्तसंस्था – 

सध्या कोरोना विषानुने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. गेल्या महिन्यात संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता आणि लॉकडाऊनची मुदत 3 मे रोजी संपणार होती  मात्र कोरोनाचा विळखा पाहता आता पुन्हा केंद्र सरकारने लॉकडाऊनची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे या लॉकडाउन चा त्रास जरी होत असला तरी याशिवाय मात्र कोणताच पर्यायही उरलेला नाही. प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मंत्रीमंडळातील निवडक मंत्र्यांशी 3 मे नंतरच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखत अजून 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेनेही 17 मे पर्यंत लॉकडाऊन चालु राहील अशी माहिती दिली आहे.