रेकॉर्डवरील आरोपीकडून एक गावठी पिस्टल व काडतुस जप्त, यवत गुन्हे शोध पथकाची वरवंड येथे कारवाई

दौंड : यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रेकॉर्डवरील आरोपीकडून एक गावठी पिस्टल व काडतुस जप्त करण्यात यवत गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. ही कारवाई वरवंड येथे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.१२ ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, हिरालाल खोमणे असे गणेशोत्सवाचे अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार निलेश कदम यांना माहिती मिळाली की  अमोल राजेंद्र नातू (रा.पिंपळगाव ता.दौंड जि.पुणे)  याच्याकडे गावठी पिस्टल असून तो हॉटेल पाटील चावडी वरवंड येथे असून त्याने अंगात मोरपंखी रंगाचा शर्ट व निळे रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे.

ही माहिती मिळाल्याने वरील पथकासह व पंचासह पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अमोल राजेंद्र नातू (वय ३२ रा.पिंपळगाव ता.दौंड जि.पुणे) असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी पिस्टल व एक काडतुस मिळाले असून सदर आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम ३,(२५),मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७(१),(३),१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी बाप्पूसाहेब दडस, पोलीस निरक्षक नारायण देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, हिरालाल खोमणे यांचे पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहोत.