‘चौफुला’ येथे ग्राहकांच्या शोधात असणाऱ्या ‘त्या’ ‘पाच’ जणींवर यवत पोलिसांची कारवाई

दौंड : चौफुला ता. दौंड येथे अनेक दिवसांपासून काही महिला रस्त्याच्या कडेला थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील हातवारे करून ग्राहक बनवत असल्याचा प्रकार सुरु होता.

याबाबत यवत पोलीस या महिलांच्या शोधात असतानाच त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की त्या संशईत महिला चौफुला येथील रोडवर उभे राहून येणारे जाणारे लोकांना हातवारे करत आहेत. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता त्या पाच महिला सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करत असताना मिळून आल्या.

यवत पोलिसांकडून या पाच महिलांविरोधात मुंबई पोलीस अधिनियम कलम 110/117 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदर महिला ह्या चौफुला येथे थांबून आपले ग्राहक शोधून वेगळाच व्यवसाय करत असल्याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत सुरु होती. त्या प्रकाराबाबत अनेकजण एक दुसऱ्याकडे याबाबत तक्रारही करत होते मात्र पोलीस ठाण्यात जाऊन अधिकृत तक्रार करण्यास कोणी धजावत नव्हते.

मात्र यवत पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अखेर या पाच महिलांवर कारवाई केल्याने येथील आया-बहिणींनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सदरची कारवाई ही यवत चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोसावी, पोलीस नाईक जाधव, महिला पोलीस सुवर्णा गायकवाड यांनी केली आहे.