हा टॅटू कोणाचा..? निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या ‘त्या’ व्यक्तीची ओळख पटविण्याचे भिगवण पोलिसांकडून आवाहन

पुणे : इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या उजनी धरणातील बॅक वॉटर पाण्यामध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने एका अनोळखी पुरुषाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली असून या पुरुषाची ओळख पाठविण्याचे आवाहन भिगवनचे सहा.पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.

या हत्येतील पुरुषाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असून त्याचा धारदार हत्याराने खुन करून त्याचे डोके माने पासुन बाजुला करण्यात आले आहे. तसेच त्याचे दोन्ही हात, दोन्ही पाय कट करून मयताची ओळख पटु नये म्हणुन त्याचे माने पासुन डोके वेगळे करून ते कुठेतरी फेकून देण्यात आले आहे. या इसमाच्या अंगावर कपडे न ठेवता त्याच्या शरीराचे अवयव प्लॅस्टीकचे कागदामध्ये व निळे, पांढरे रंगाच्या पिशवीमध्ये भरून बांधुन ते उजनी धरणातील बॅकवॉटरच्या पाण्यामध्ये टाकुन देवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर गुन्हयाचा तपास चालू आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी व अनोळखी मयताचा व त्याचे वारसांचा शोध घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयाचा सखोल तपास करणे आहे.

मयताचे वर्णन – एक अनोळखी पुरुष इसमाचे प्रेत अंदाजे वय ३० ते ३५ वर्षोचे, प्रेतास डोके
नसलेले, मानेपासुन कट केलेले प्रेताचे दोन्ही हात खांदयातुन कट केलेले व दोन्ही पाय मांडयामधुन
कट केलेले, मयताचे उजवे हाताचे मनगटाचे पाठीमागे पोटरीवर टॅटु काढलेला काळे रंगाची बॉरडर असलेला व त्यामध्ये लाल रंग असलेला मयताचे नेसणीस एक तपकिरी रंगाची कंपनीची अंडरवेअर, मयत बाँडीची कातडी निघालेली दिसत आहे.
याबाबत कोणाला काही माहिती असल्यास खालील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भिगवण पोलीस स्टेशन, ( पुणे ग्रामीण )

सहा.पोलिस निरीक्षक दिलीप पवार

पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम

संपर्क नंबर०२१२/२४६२३३
९८५०३०११३३
८०८७७७५८२६