दौंड : दौंड तालुक्यात सध्या नेत्यांपेक्षा पोत्यांनी वातावरण जास्त तापवलेलं दिसतंय. कारण कोण, कधी, काय लिहितो आणि मी मध्ये येऊन लगेच तळी कशी उचलतो याची जणू काही स्पर्धाच काहींनी सुरु केल्याचं दिसत आहे.
बालिश पणाचा कहर म्हणजे जे अधिकृत प्रसार माध्यमे आहेत. ज्यांकडे बातम्या छापण्यासाठी केंद्र सरकारची लागणारी अधिकृत (RNI) ची मान्यता आहे. ज्या अधिकृत माध्यमांची पोर्टल आहेत त्या अधिकृत माध्यमांनाच काही बालिश आणि वृत्तपत्र, माध्यमांचा कच्चा अभ्यास असणारे सोशल मीडिया म्हणून संबोधू लागले आहेत. आणि स्वतःला मात्र लिखाणाचा स्वयंघोषित सम्राट समजून वाट्टेल ते, वाट्टेल तसे एका खाजगी वेबसाईटच्या माध्यमातून आपले ज्ञान पाजळू लागले आहेत. राजकारण, टिका या चौकटीच्या बाहेर लिखाण नसणारे आणि सगळे वेडे मीच फक्त हुशार, मला घाबरायला हवे असा इगो घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून उतरलेले महाभाग आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एकही जनताभीमुख माहिती का प्रसिद्ध करत नसावे असा सवाल जनतेला पडला आहे. लिखाण करताना कुणाची प्रतिमा मलीन करण्याचा अधिकार कुणालाच नाही आणि याबाबत प्रेस कौन्सील ऑफ इंडियच्या गाईडलाईन्स सुद्धा आहेत. मात्र फक्त दुसऱ्यांवर टिका टिप्पणी करून स्वतःच्या मनाला तृप्त करणारे महाभाग उगच नको तिथे आपले नाक खुपसायचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत.
आपले चांगले ज्ञान लोकांच्या भल्यासाठी कामाला आणण्याचा प्रयत्न लिखाणातून करायचा असतो इथे मात्र उलट-सुलट लिहून आपले अगाध ज्ञान पाजळले जात असल्याचे दिसत आहे. उगच नको तिथे अधिकृत प्रसार माध्यमांच्या, वृत्तपत्र व त्याच्या पोर्टलवरील त्या बातम्यांवर आपले नाक खुपसून लोकांमध्ये त्याची वाहवा करण्यासाठी सोशल मिडीयचा आधार घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
आजही काहीजण असल्या लिखाण करणाऱ्यांना आपल्यापेक्षा वयाने थोडे मोठे आहे असे समजून इज्जत देत आले आहेत मात्र त्या इज्जतीला आपला धाक समजून स्वतःची टीमकी मिरविणाऱ्यांना आता आपले बिंब आरश्यात पहावे लागणार असे दिसते. दोन हाना पण लिखाण सम्राट म्हणा ही सवय लोकांच्या मनातून उतरण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा सोशल मिडियावर सुद्धा होऊ लागली आहे. येऊ नको, तर कुठं बसू अशी अवस्था सध्या काहींची पहायला मिळत आहे.
त्यामुळे नेत्यांपेक्षा लिखाण बहाद्दराचीच किटली जास्त गरम झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नेते लोकांपेक्षा आता यांनीच उमेदवारी अर्ज भरावेत आणि आपल्याला जनतेचा किती प्रतिसाद मिळतो याची एकदा चाचपणी करावी अशी मागणीही होत आहे. कुणाच्या आडव्यात जाण्याची सवय नसलेल्यांना मात्र हे मुद्दाम आडवी मारू लागल्याचे आता त्यांच्या कृतिवरून दिसत आहे. त्यामुळे आला अंगावर तर घ्यावे लागते शिंगावर… कारण ज्यां गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी सुद्धा आहेत हे अतिहुषारांनी समजून घेणे गरजेचे आहे. वृत्त लिखाणाची आवड असणाऱ्यांनी अगोदर अधिकृत माध्यम धरावे, अण मग लिखाण करावे म्हणजे सोशल मीडिया आणि अधिकृत माध्यमांधील फरक लक्षात येईल.