US Update – अखेर जो बायडन राष्ट्राध्यक्ष तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष होण्यावर झालं शिक्कामोर्तब



इंटरनॅशनल : 

ट्रम्प समर्थकांनी केलेला हल्ला आणि अमेरिकेत उफाळून आलेला गृह कलह याची पर्वा न करता अमेरिकेतील काँग्रेसच्या संयुक्त सत्रामध्ये माईक पेन्स आणि नॅन्सी पलोसी जो बायडन आणि कमला हॅरीस यांच्या राष्ट्राध्यक्ष आणि उप राष्ट्राध्यक्ष निवडीबाबत काही वेळापूर्वी घोषणा केली आहे.

निवडणुकीत पेन्सलव्हेनिया आणि अॅरिझोनामधल्या मतांवर केले गेलेले आरोप हे सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज अशा दोन्ही विभागांकडून  फेटाळून लावण्यात येऊन  झालेल्या इलेट्रोल मतांना मान्यता देण्यात आली आहे.

काल याबाबत येथील सदनांमध्ये यावर मोठी चर्चा सुरू असतानाच कॅपिटल बिल्डिंगवर डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी या सदनावर हल्ला केला होता. यावेळी अनेक समर्थकांनी आतमध्ये सशस्त्र पणे दाखल होताना पोलिसांशी झटापट झाली होती. याच हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाल्याचं वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी सांगितलं आहे.

काल चर्चा सुरू असताना कॅपिटल इमारतीच्या बाहेर जमलेल्या ट्रंप यांच्या समर्थकांनी इमारतीत घुसखोरी केल्याने ही सदनातील चर्चा थांबवण्यात आली होती.

सदनात अमेरिकन काँग्रेसचे सत्र सुरू असताना ट्रंप समर्थकांनी बॅरिकेड तोडून आत घुसखोरी केली आणि पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत 5 जणांचा बळी गेला तर 52 जणांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले.