विकास शेळके
पारगाव : देलवडी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुदाम अडागळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उप सरपंचपदी सुरेखा भानुदास टकले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंचपदी टकले यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
उपसरपंच पदाच्या निवडणूकिसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक व्ही.एन. झाडगे यांनी काम पाहिले. तर सरपंच नीलम काटे यावेळी उपस्थित होत्या. सुरेखा टकले यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच नागरिकांनी एकच जल्लोष केला तर यावेळी उपस्थितांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे, रामभाऊ काटे, अनिल वांझरे, अर्जुन वांझरे, अर्जुन वाघोले, बाजीराव सूळ काकाजी शेलार, डी आर शेलार, दत्ताभाऊ शेलार, ग्रामपंचायत कमिटीसह आजी माजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सुरेखा भानुदास टकले यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून स्वागत केले यावेळी कैलास विद्यामंदिर (राहु) प्राचार्य विकास टकले सर यांनी सर्वांचे आभार मानले.