SRPF प्रशिक्षण केंद्राच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र(नानविज) व ससून सर्वोपचार रुग्णालय(पुणे) प्रादेशिक रक्तपेढी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नानविज येथील प्रशिक्षण केंद्रा मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 रा.रा.पो. बल पुणे परिक्षेत्रचे पो.उप. महानिरिक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाने  व प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रोहिदास पवार यांच्या अधिपत्या खाली येथील 62 अधिकारी व  पोलीस कर्मचाऱ्यांनी शिबिरामध्ये रक्तदान केले.

यावेळी प्राचार्य पवार, उपप्राचार्य कैलास न्यायनीत तसेच डॉ. शंकर मोगावे(ससून रुग्णालय) यांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले.रक्तदान शिबिर यशस्वी होण्यास प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.पी.वलसंगे, अधिपरिचारिका व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.