दौंड : शिव जनसेवा युवा मंचच्या वतीने दौंडमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये दौंड शहर व तालुक्यातील 22 जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.
या 22 जणांचा युवा मंच च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिबिराचे आयोजक व युवा मंच चे पदाधिकारी रुपेश बंड, अशपाक सय्यद तसेच सहाय्यक समादेशक दिगंबर कदम, डॉ. राजेश दाते, संत तुकडोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रताप गुणवरे,पिंटू लोंढे, शैलेश पिल्ले, कुलदीप कांबळे, दादा देशमुख, दिलीप बंड, अशोक काशीद, रवी बंड आदि उपस्थित होते.