Shocking News | मुंबई जवळ आर.पी.एफ कॉन्स्टेबलकडून रेल्वेत गोळीबार, रेल्वे पोलीस अधिकाऱ्यासह 4 प्रवाशी ठार

मुंबई : मुंबईच्या पालघर ते दहिसर, मीरा रोड दरम्यान मुंबई-जयपूर पॅसेंजरमध्ये एका आर पी एफ कॉन्स्टेबलने रेल्वे पोलीस आणि 3 प्रवाश्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात त्या रेल्वे पोलिसासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे 5 वाजून 23 मिनिटांनी ही घटना घडली आहे. चेतन सिह या आरोपी जवानाला पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. मुंबई जवळ जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडल्याची माहिती मिळताच एकच खळबळ माजली आहे.

चेतन सिह असे आरोपी कॉन्स्टेबल चे नाव असून राजस्थानातून महाराष्ट्र राज्यातील पालघर येथे आल्यानंतर या कॉन्स्टेबलने आपल्या बंदुकीतून बेछूट गोळीबार केला ज्यात एक आरपीएफ चा अधिकारी आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन हल्लेखोराला ताब्यात घेतलं.

हे होतं गोळीबाराचं कारण…
मिळत असलेल्या माहितीनुसार रेल्वेतील प्रवाशी आणि आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याचा ट्रेनच्या डब्यामध्ये वाद झाला. यावेळी राग अनावर होऊन चेतन सिंहने प्रवाशांवर बंदूक उगारली होती मात्र त्याच्या सहकाऱ्याने यावेळी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना रागात असलेल्या चेतन सिंह ने त्याला थांबवणाऱ्या आरपीएफच्या कर्मचाऱ्यासह तीन प्रवाशांवर बेछूट गोळीबार केला. या चौघांचा जागीच मृत्यू झाला. जयपूर एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.