धक्कादायक…
अपहरण झालेल्या ‘त्या’ चिमुकलीचा बापानेच केला ‘खून! पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

पुणे : शिरूर तालुक्यातील (बजरंगवाडी) शिक्रापूर येथून एक सात वर्षाची चिमुकली बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या मुलीचे अपहरण झाले असावे असा कयास लावला जात होता मात्र यात आता मोठी माहिती समोर येत असून ‘त्या’ चिमुकलीचा खून झाला असून तो तिच्या वडिलांनीच केला असल्याचे समोर येत आहे.

पोलीस यंत्रणा त्या चिमुकलीचा शोध घेत असताना सर्व परिसरातील सिसिटीव्ही तपासण्यात आले त्यावेळी ती चिमुकली तिच्या बापासोबत नदी किनारे गेल्याचे त्यामध्ये दिसले. तपास होत असताना अगोदर त्या मुलीचे अपहरण झाले असावे या संशयातून शिक्रापूर पोलीस ठाण्यात आज्ञात इसमावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील घटना उघडकीस आल्यानंतर मात्र सर्वांच्या पायाखालची वाळूच सरकली.

खून झालेल्या मुलीचे नाव अपेक्षा युवराज सोळुंके (वय ७) असे होते. ती मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बेपत्ता झाली होती. तीचा शोध लागत नसल्याने तिच्या आईने दिलेल्या फिर्यादिवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता मुलीच्या वडिलांनीच मुलीचा वेळ नदीच्या पाण्यात फेकून दिल्याची कबुली दिली.

पोलिसांनी वेळ नदीपात्रात धाव घेत पाणी केले असता मुलीच्या चपला मिळून आल्या मात्र मुलीचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत मिळून आला नाही. पोलिसांनी मुलीचे वडील युवराज सोळुंके यास ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.