दौंड : दौंड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शासकीय) मोठ्या उत्साहात व शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली. तहसीलदार संजय पाटील,पोलीस निरीक्षक विनोद घुगे,नगरपालिकेच्या उप-मुख्याधिकारी सुप्रिया गुरव यांनी येथील शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दौंड नगरपालिकेच्या वतीने शिवरायांच्या स्मारकाची उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती. यावेळी मा. नगराध्यक्ष शितल कटारिया तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंती निमित्ताने यावेळी शिवजन्माचा पाळणा म्हणण्यात आला, तसेच शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 3ते 5 वर्ष वयोगटातील सर्वेश किरण शेळके याने आपल्या वेशभूषेने व करारी आवाजातील वक्तृत्वाने सर्वांची मने जिंकली.
अखिल भारतीय मराठा महासंघ (दौंड शहर व तालुका),रोटरी क्लब ऑफ दौंड व शिवस्मारक समितीच्या वतीने तीन दिवसीय परिवर्तन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. दीपक शिकारपुर, मकरंद टील्लू व डॉ.गिरीश जखोटिया यांची व्याख्याने यावेळी झाली. हरी ओम उद्योग समूहाचे राजेश पाटील व रोहित पाटील यांच्या पुढाकाराने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय परिसरातील दत्त मंदिर प्रांगणामध्ये छत्रपती शिवरायांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते.
पंचक्रोशीतील वाड्या-वस्त्यांवरून शिवप्रेमी भगवे झेंडे घेऊन शहरात दाखल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला होता, शिवमय वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.
Home Previos News छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दौंड शहरात उत्साहात साजरी, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या...