सासवड : गावी येण्या-जाण्यासाठी गाडी पाहिजे मात्र घरचे लोक गाडी घेवुन देत नाही म्हणून एका बहाद्दरने गाडया चोरी करून त्या थोड्या दिवस वापरून नंतर त्या सोडुन द्यायची पद्धत अवलंबली मात्र 5 वी मोटार सायकल चोरून फिरत असताना तो अलगद सासवड पोलिसांच्या ताब्यात सापडला असून त्यावर चोरीचे 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोटार सायकली चोरणाऱ्या आरोपीचे नाव अल्ताफ ईकरार सय्यद (वय 20 वर्षे, रा. अजय मिश्रा यांचे खोलीत भाडयाने, निवृत्ती कार डेकोर/वाशिंग सेंटर जवळ, रूई एम.आय.डी.सी, बारामती, ता. बारामती, जि. पुणे. मुळ रा.सेक्टर.22, पुरानी सिमापुरी, नोयडा, दिल्ली, उत्तर प्रदेश.) असे असून दि. 29/07/2023 रोजी पोलीस हवालदार संतोष शिंदे, गणेश पोटे, योगेश गरूड, वाहतुक वार्डन ऋतुराज देसाई, विक्रम जगताप हे पोलीस कर्मचारी सासवड शहरात जेजुरी नाका येथे वाहतुक नियमन व वाहतुक कारवाई करीत असताना दुपारी 3 च्या सुमारास तो संशयास्पद स्थितीत मोटार सायकल घेवुन जाताना दिसुन आला.
वाहतूक पोलिसांनी त्यास थांबवत त्याच्याकडे गाडीचे कागदपत्र, वाहन चालवण्याचा परवाना मागितला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि त्यानंतर त्याने त्याचे ताब्यातील होंडा शाईन गाडी सोडुन नारायणपुर बाजुकडे पळुन गेला. त्यावेळी वरील पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडुन ताब्यात घेतले. आणि त्यास विश्वासात घेवुन त्याच्या ताब्यात असणाऱ्या होंडा शाईन मोटार सायकल नं. MH.42.AB.0327 बाबत विचारपुस केली असता त्याने सदरची मोटार सायकल त्याने बारामती रूई एम.आय.डी.सी परीसरातुन चोरलेली असल्याची कबुली दिली.
तो चाकण येथुन बारामती येथे घरी महिन्यातुन जात येत होता. पण गावी जाण्या येण्यासाठी गाडी पाहिजे होती. घरचे लोक गाडी घेवुन देत नव्हते. म्हणुन तो गाडया चोरून काही दिवस वापरून सोडुन देत असल्याचे आणि सासवड परीसरातुनही 4 मोटार सायकल चोरी केल्या असल्याचे सांगितले.
सासवड पोलिसांनी आरोपीकडुन खालील 5 गुन्हे उघडकिस आणुन गुन्हयातील मोटार सायकल जप्त केल्या आहेत.
1)सासवड पो.स्टे.गु.र.नं.230/2023 भा.दं.वि.का.क. 379 गुन्हयातील होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.50.F.3931 किं.रू.50,000/-
2)सासवड पो.स्टे.गु.र.नं.348/2023 भा.दं.वि.का.379 मधील होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.12.QU.8092 किं.रू.45,000/-
3)सासवड पो.स्टे.गु.र.नं.378/2023 भा.दं.वि.का.379 मधील होंडा युनिकाॅर्न मोटार सायकल नं. MH.12.GW.2488 किं.रू.45,000/-
4)सासवड पो.स्टे.गु.र.नं.406/2023 भा.दं.वि.का.379 मधील होंडा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं. MH.12.JY.5568 किं.रू.15,000/-
5)बारामती तालुका पो.स्टे.गु.र.नं.413/2023 भा.दं.वि.का.379 मधील होंडा शाईन मोटार सायकल नं.MH.42.AB.0327 किं.रू.30,000/- असा एकुण 1 लाख 85 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सो, आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, भोर विभाग तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन संतोश जाधव, पोलीस अंमलदार संतोश शिंदे, गणेश पोटे, योगेश गरूड, जब्बार स्ययद, विशाल नगरे, शरद जाधवर, होमगार्ड विक्रम जगताप, ट्राफिक वार्डन श्रीकांत भंडलकर, चक्रधर गोपाळघरे, ऋतुराज देसाई, सचिन पवार, अक्षय लोंढे यांचे पथकाने केलेली आहे.