दौंड : सहकारनामा ऑनलाईन
आज गणपती विसर्जन असल्याने दौंड तालुक्यात सर्वत्रच उत्साहात आणि नियमांचे काटेकोर पालन करून गणेश विसर्जन केले गेले मात्र राहू गावमध्ये या उत्साहावर विरजण पडले असून राहू येथे भीमा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करायला गेलेला एक युवक मूर्ती विसर्जन करताना पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नदीत वाहून गेलेल्या युवकाचे नाव दुर्गेश पंडित असल्याचे ग्रामस्थांकडून माहिती मिळत असून तो 11 वीत शिकत होता. दुर्गेश हा गणेश मूर्ती विसर्जन करत असताना बुडत असल्याचे पाहून तेथील सर्प मित्राने वाहत्या पाण्यात उडी मारून त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा बहाव जास्त असल्याने त्याला त्यामध्ये यश आले नाही.
दुर्गेश पंडित यास शोधण्यासाठी राहू चे ग्रामस्थ सध्या होडी आणि बोटीच्या साहाय्याने त्याचा शोध घेत आहेत मात्र अजूनही त्याचा शोध लागत नसल्याने त्याच्या परिवारासह ग्रामस्थही चिंतेत आहेत.