अश्लील चाळे करणाऱ्यास न्यायालयाने सुनावला सश्रम करावास, यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

दौंड : सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे एकास चांगलेच महागात पडले असून त्यास दोन भादवी कलमांमध्ये 3-3 महिन्याच्या सश्रम करावासाची शिक्षा व 2 हजार आणि 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

तानाजी नामदेव यादव (रा. भोसलेवाडी उंडवडी ता दौंड जि पुणे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्यावर गुन्हा रजि नं.व.कलम -97/15,-353,294,504,85(१)(२), नुसार न्यायालयात खटला सुरु होता.

यामध्ये आर के देशपांडे सो कोर्टामध्ये सरकारि वकील स्नेहल नाईक मँडम तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ASI एन ए नलावडे, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी- API अर्जुन घोडेपाटील, प्रभारी अधिकारी-पो निरीक्षक नारायण पवार यवत पो स्टे, तपासी अधिकारी-ए एस आय पी टी ननवरे सेवानिवृत्त, कोर्ट अंमलदार -वेनुनाद ढोपरे पो ना ब नं -1156 या सर्वांनी योग्य पद्धतीने आरोपीचे कृत्य कोर्टासमोर मांडले.

त्यामुळे सदर आरोपीस मे कोर्ट यांनी भा द वी क 294,,मध्ये 3,महिने सश्रम कारावास व 2,000/ रू दंड न भरल्यास 1 महिना साधी कारावासाची शिक्षा व 85 (1) (2) मध्ये 3,महिने सश्रम कारावास व 5,000/रू दंड न भरल्यास 1 महिना साधी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.