विजेच्या विविध मागण्या आणि नियोजनाबाबत आमदार कूल यांची आढावा बैठक

दौंड : महाराष्ट्र कृषी पंप वीज धोरण २०२० अंतर्गत दौंड तालुक्यातील अतिभारीत रोहीत्रांवरील भार कमी करण्याकरिता रोहित्र क्षमता वाढ, अतिरिक्त २६५ रोहित्रांची उभारणी, भार व्यवस्थापन, कृषी प्रवण उपकेंद्रामध्ये स्वयंचलित कॅपेसिटर बँक कार्यान्वित करणे, कृषी वाहिन्यांवर योग्य क्षमतेचे कॅपेसिटर बसविणे, नवीन सबस्टेशन, विविध सबस्टेशनमध्ये पॉवर टी / एफ वाढवणे आदी कामांसाठी तसेच लघुदाब वाहिनी व उच्चदाब वाहिनीद्वारे (HVDS) प्रलंबित कृषी पंपांच्या नवीन वीज जोडणी बाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती आमदार राहुल कूल यांनी दिली.

यावेळी वरील विषयांसंदर्भात आमदार राहुल कूल आणि महावितरणचे केडगाव उपविभाग कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांची त्यांच्या कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र कृषी पंप वीज धोरण २०२० अंतर्गत दौंड तालुक्यात सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा आ.कूल यांच्याकडून घेण्यात आला. तसेच जिल्हा नियोजन मंडळाद्वारे नवीन रोहित्रांच्या उभारणीसाठी आपण केलेल्या मागण्यांवरील कार्यवाही बाबत चर्चा करण्यात आली. भारनियमन करताना कृषी पंपांची तसेच औद्योगिक गरज लक्षात घेत योग्य नियोजन करावे, सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण करावीत आदी सूचना यावेळी आ.कूल यांनी केल्या.

या बैठकीला यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली आण्णा ताकवणे, सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री. किशोर शिंदे, सहाय्यक अभियंता श्री. पराग सुलाखे, केडगाव ग्राप उपसरपंच प्रवीण पिसे, सदस्य पांढरे, किरण देशमुख व परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.