|सहकारनामा|
दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त
पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशालिताई नागवडे यांच्यावतीने यवत, बोरीभडक, देऊळगाव गाडा, केडगाव, वरवंड, पाटस या ठिकाणी असणाऱ्या तब्बल 6 कोविड सेंटरला मोफत जेवण देण्यात आले आहे. तर कोविड चे नियम नागरिकांनी पाळून त्यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी मास्कचेही वाटप करण्यात आले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वा वर्धापनदिन असून 1999 साली सोनिया गांधी या काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची 10 जून रोजी स्थापना केली. आज त्यास 22 वर्षे पूर्ण झाली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यात आणि देशातील राजकारणात सक्रिय सहभाग असतो आणि शरद पवार या नावाचा मोठी जरबही आहे.
शरद पवार यांचे काँग्रेसमध्ये बिनसल्यानंतर काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि शरद पवार यांनी ही बिहारमधील तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांच्या सोबत 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
आज या पक्षाला 22 वर्षे पूर्ण झाली असून या 22 वर्षांत केवळ 5 वर्ष हा पक्ष सत्तेबाहेर राहिला आहे हे विशेष.