दौंड : दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी काल केलेल्या वक्तव्याचे आज स्पष्टीकरण दिले आहे. माजी आमदार रमेश थोरात यांनी काल माध्यमांशी बोलताना महेश भागवत यांच्याबाबत त्यांची औकात नाही असे एक वक्तव्य केले होते. मात्र त्या वक्तव्यावरून गदारोळ उठल्यानंतर आज रमेश थोरात यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
माजी आमदार रमेश थोरात यांनी याबाबत बोलताना, माझ्या बातमीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला औकात असे म्हणायचे नव्हते तर आवाका असे म्हणायचे होते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
पुढे बोलताना त्यांनी, माझ्या बातमीचा चुकीचा अर्थ काढू नये मी कधीही कोणत्याही व्यक्ती बद्दल आणि जातीपातीचे राजकारण किंवा व्यक्तिगत द्वेष माझ्या पन्नास वर्षाच्या राजकारणात व मनातही ठेवला नाही आणि कधीच ठेवणारही नाही असे सांगितले.