पारगाव (दौंड) : विधानसभेला कुल आणि थोरात यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेले राजाराम तांबे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादी (श.प) गटाला पाठिंबा दिला होता, मात्र आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षात प्रवेश केला आहे.
पारगाव शिंदेवाडी येथील युवक आणि नागरिकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे युवा नेते राजाभाऊ तांबे यांना धक्का मानला जात आहे राजाभाऊ तांबे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या शिंदेवाडी येथील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे आमदार राहूल कुल यांच्या कार्याची दखल घेऊन आणि तांबे यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
मधील संभाजी तांबे कानिफनाथ तांबे अनिल तांबे सुनील तांबे बाळासाहेब तांबे धनंजय तांबे संजय शिंदे लव्हजी काळे गणेश पन्हाळे अथर्व तांबे राज जेधे संदीप शिंदे सोहम भोसले विजय तांबे अशोक काळे संतोष काळे दीपक काळे, रवी काळे महेंद्र शिंदे चंद्रकांत तांबे सुजल चव्हाण आदित्य तांबे नवनाथ काळे संतोष तांबे या युवकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मराठा समाजातर्फे रिंगणात असलेले राजाभाऊ तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांना दिला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी या युवकांनी महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्याबरोबर प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने तांबे यांना हा धक्का मानला जात आहे