पुणे | भावजईसोबत लफडे असलेल्या दिराने भावजईसह दोन मुलांचा केला खून, तिघांचे मृतदेह घरातच जाळले

पुणे : पुणे शहरातील कोंढवा परीसरात एक भयानक घटना उघडकीस आली आहे. भावजई सोबत प्रेम संबंध असलेल्या आणि तिच्यासोबत पळून पुण्यात आलेल्या दिराने भावजय आणि तिच्या दोन लहान मुलांचा खून करून नंतर त्यांना घरातच जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत कोंढवा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.

आम्रपाली वाघमारे (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून यात तिच्या सहा आणि चार वर्षे वयाच्या दोन मुलांनाही जीवे मारून घरात जाळण्यात आले आहे. गजबजलेल्या कोंढवा परीसरात ही भयानक घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

नराधम दिराने आपल्या भावाची पत्नी आम्रपाली हिला काही महिन्यांपूर्वी पुण्यात तिच्या दोन मुलांसह पळवून आणले होते. मात्र तीचे बाहेर कुठेतरी लफडे असावे या संशयातून काल रात्री नराधम दिराने अगोदर तीचा खून केला. नंतर मुले रडत असल्याने त्यांचाही खून करून तिन्ही मृतदेह त्याने घरातच जाळले. ही भयानक घटना पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिची पाहणी केली आणि फरार झालेल्या दिराला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करायचे काम सुरु केले आहे.