Police mitra – ‛पोलीस मित्र’ शांतिदूत परिवार संघटनेच्या बारामती ‛तालुकाध्यक्षपदी’ सुपे येथील ‛जावेद इनामदार’ यांची निवड



|सहकारनामा|

बारामती : पोलीस मित्र शांतिदूत परिवार संघटनेेेच्या बारामती तालुकाध्यक्षपदी सुपे येथील जावेद बाबूलाल इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. 

त्यांच्या अध्यक्षपदीय निवडीचे नियुक्ती पत्र प्रदान करताना पोलीस मित्र शांतिदुत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशेष, पोलीस महानिरीक्षक कारागृह विभाग महाराष्ट्र राज्य.से.नि.) डॉ.विठ्ठल जाधव (IPS, IG), पोलीस मित्र शांतिदूत संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अकबर मेमन हे उपस्थित होते.

यावेळी प्रदेश अध्यक्ष अकबर मेमन यांनी बोलताना पोलीस मित्र शांतिदुत संघटनेचा उद्देश हा संपूर्ण राज्यातील सुशिक्षित आणि चांगल्या व्यक्ती संघटनेत घेऊन त्यांच्यावतीने राज्यातील पोलीस यंत्रणेला मदतीचा हातभार मिळावा असा असल्याचे सांगितले. तसेच बारामती तालुक्यात जावेद इनामदार यांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात असलेले  उल्लेखनीय कार्य पाहता त्यांची बारामती तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर करत इनामदार यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

यावेळी जावेद इनामदार यांनी बोलताना पोलीस मित्र शांतिदुत संघटनेच्या ध्येय धोरणांना समोर ठेऊन बारामती तालुक्यातील पोलीस यंत्रणेला हर प्रकारे जास्तीत जास्त सहकार्य करणार असल्याचे आणि या संघटनेत स्वच्छ प्रतिमा असलेल्या युवकांची फळी तयार करणार असल्याचे सांगितले.