दौंड : खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या निधीतून पडवी (ता.दौंड) येथील बोरबनवस्ती आणि पडवी पाटी ते जगताप वस्ती येथे रस्त्याच्या कामासाठी विस लाख रुपये निधी देण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या निधीतून बोरबनवस्ती येथे दहा लक्ष रुपये तसेच पडवी पाटी ते जगतापवस्ती येथे रस्ता करणे या कामासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसद महारत्न खासदार सौ.सुप्रिया सुळे यांच्या निधीतून दहा लक्ष रुपये निधी देण्यात आला आहे. हा निधी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झाला असून या दोन्ही रस्त्याचे भूमिपूजन कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन रामभाऊ टुले यांच्या अध्यक्षतेखाली आणि आप्पासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या भूमिपूजन कार्यक्रमाला वरील मान्यवरांसह महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस अजित शितोळे, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन काळभोर, सोशल मीडिया अध्यक्ष चैतन्य पाटोळे, पडवी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक आणि गावातील ग्रामस्थ, तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.