मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हीच खरी कै.अण्णासो पाटील यांना श्रद्धांजली : विकास जगदाळे

दौंड : या महाराष्ट्र सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले नाही तर दुसऱ्या दिवशीचा सूर्य हा अण्णासो पाटील बघणार नाही ही भीष्मप्रतिज्ञा लाखो मराठा बांधवांच्या साक्षीने मराठा महासंघाचे संस्थापक व माथाडी कामगारांचे नेते स्वर्गीय आमदार अण्णासो पाटील यांनी 22 मार्च 1982 रोजी घेतली होती. लाखो मराठा समाज एकत्र येऊन सुद्धा निर्लज्ज सरकार आपली एकही मागणी मान्य करीत नाही हे दिसू लागल्याने 23 मार्च रोजी अण्‍णासो पाटील यांनी आपल्या स्वतःवर पिस्तुलाने गोळी झाडून घेतली. त्यांच्या बलिदाना नंतरही समाजाला अद्याप न्याय मिळालेला नाही म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हीच खरी स्वर्गीय अण्णासो पाटील यांना श्रद्धांजली असेल असे प्रतिपादन तालुका युवक अध्यक्ष विकास जगदाळे यांनी केले. स्वर्गीय अण्णासो पाटील यांच्या 40 व्या स्मृति दिनानिमित्त दौंड येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपले प्रखर विचार मांडले. यावेळी अण्णासो पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत उपस्थितांनी अभिवादन केले.
प्रसंगी नंदू जगताप, हरिभाऊ ठोंबरे, आदिनाथ थोरात, मधुकर मावळे, दिलीप जाधव,दादासाहेब नांदखिले, प्रसाद गायकवाड, विक्रम पवार, आबा फराटे, दिपक विघ्ने, रोहन घोरपडे, राजेंद्र माने, मदन जठार, बापू घोरपडे, विनय लोटके, सज्जन काकडे,महादेव कवडे, वैजनाथ जाधव, संजय पवार, यशवंत पिलाने,किरण लबडे,राजू ढाने,हरिभाऊ काळे,तुषार ढवान, अमित झोजे,विशाल भापकर उपस्थित होते.
सर्व उपस्थितांचे शैलेश पवार यांनी आभार मानले.