‛महाभारतातील’ गदाधारी ‛भीम’ कालवश

मुंबई : 90 च्या दशकात ‛महाभारत’ या टीव्ही मालिकेतून लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांच्या पसंतीला उतरलेले गदाधारी भीम उर्फ प्रवीण कुमार यांचे आज निधन झाले आहे ते 74 वर्षांचे होते.


दूरदर्शनवर बीआर चोप्रा निर्मित महाभारत ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली होती. त्याकाळी महाभारत मालिका पाहण्यासाठी वाड्या, वस्त्यांवरून लोक 10-10 किलोमीटर प्रवास करून गावात येत असत यावरूनच या मालिकेची क्रेझ लक्षात येईल.

या मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार यांचे भीम हे पात्र तर लहान मुलांचे इतके आवडीचे ठरले होते की त्यावेळी बाजारात गेल्यानंतर मुले आवर्जून प्लॅस्टिकची ‛गदा’ घेण्याचा हट्ट करायची आणि ती घेतल्याशिवाय घरीच येत नसत. अशी ही प्रसिद्ध भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचे आज निधन झाल्याने दुःख व्यक्त केले जात आहे.