19 सप्टेंबर रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन, आ.राहुल कुल व कै.सुभाष आण्णा कुल मेमोरीयल चॅरिटेबल ट्रस्ट चा उपक्रम

दौंड : दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व मोफत उपचार मिळावेत यासाठी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या संकल्पनेतून व कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी, बोरमलनाथ मंदिर, बोरीपार्धी (चौफुला) येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबीरात पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित रुग्णालयांचा सहभाग असून विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार व नियोजित शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. सर्व नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन उभयंतांकडून करण्यात आले आहे.

आमदार राहुल कुल यांच्यावतीने अनेक वर्षांपासून महाआरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे. याचा सर्वात मोठा फायदा गोरगरीब रुग्णांना होत आला असून हजारो रुग्णांना यामुळे विविध आजारांमधून मुक्ती मिळाली आहे. लाखो रुग्णांना आ.कुल यांनी मदत केली असून आरोग्यदूत म्हणून त्यांना ओळखले जाते. महाआरोग्य शिबिराबाबत अधिक माहितीसाठी आमदार ॲड. राहुल कुल यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचा ७०३८ ६६ ७७ ९९ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.