मुंबई : सध्या दिवाळी आहे त्यामुळे ज्यांना जे फटाके फोडायचे आहेत ते फोडू देत. मी दिवाळी झाल्यानंतर फटाके फोडणार असे किरीट सोमय्या यांनी जाहीर केले आहे.
भाजप जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारचे आणखी 3 मंत्री त्यांचे 3 घोटाळे आणि त्यांच्या जावयांचे 3 घोटाळे असे एकंदर 6 घोटाळे बाहेर काढून त्याचा पर्दाफाश करणार, खुलासा करणार असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या नेमके कोणत्या 3 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आणि नुसते आरोप करणार की पुरावे देऊन त्यांच्यावर कारवाई होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी किरीट सोमय्या यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्या वादामध्ये उडी घेतली आहे. त्यांनी परवाच याबाबत नवाब मलिक यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे दिवाळी नंतर किरीट सोमय्या कोणता जबरदस्त फटाका फोडणार की फुसका बार निघणार हे लवकरच समजणार आहे.