|सहकारनामा|
पुणे : (अब्बास शेख)
उरुळी कांचन येथील हॉटेल ‛गारवा’ मुळे धंदा होत नाही म्हणून रामदास आखाडे यांची हत्या झाल्यानंतर बंद असलेले ‛हॉटेल गारवा’ पुन्हा एकदा कालपासून ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले असून या हॉटेल ला ग्राहकांचा पुन्हा एकदा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
उरुळी कांचन येथील हॉटेल गारवा चे मालक रामदास आखाडे यांचा व्यावसायिक वादातून खून करण्यात आला होता. काही दिवस हा खून एक रहस्य बनले होते मात्र अखेर लोणीकाळभोर पोलिसांनी या खूनाचा उलगडा करत आरोपींना जेरबंद केले होते.
रामदास आखाडे यांचा खून व्यवसाय वादातून सुपारी देऊन केला गेला होता तेव्हापासून हे हॉटेल बंद ठेवण्यात आले होते मात्र हे हॉटेल सुरू केल्यानंतर ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कालपासून हे हॉटेल सुरू होताच या हॉटेलच्या जुन्या ग्राहकांनी पुन्हा या हॉटेल ला भेट देत हॉटेल गारवा पुन्हा एकदा जोमाने चालणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.