श्री दत्त जयंतीनिमित बोरिपार्धी येथे आजपासून हरीनाम सप्ताहास सुरुवात

अब्बास शेख

केडगाव : दौंड तालुक्यातील बोरिपार्धी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर २०२५ पासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त जयंती महोत्सवाचे हे ३२ वे वर्ष आहे. या अखंड हरीनाम सप्ताहची समाप्ती दि.५ डिसेंबर रोजी होणार आहे.

बोरिपार्धी येथे आयोजित करण्यात आलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात शुक्रवारी पहाटेपासून काकडा, आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, भागवत कथा, कीर्तन, भजन अश्या विविध कार्यक्रमांचे सात दिवस आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाची सुरुवात हभप श्री सुदाम गोरखे गुरुजी, श्री श्री १०८ महंत योगी लक्ष्मणनाथजी महाराज यांच्या हस्ते विनापूजन व कलशपूजन करुन होणार आहे. ग्रंथ पूजन व साहित्य पूजन हभप श्री राहुल महाराज राऊत, हभप श्री तात्यामहाराज ढमाले (सर), भजनगंधर्व श्री आदिनाथजी सटले गुरुजी यांच्या हस्ते होणार असून गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते हभप माधवजी महाराज रसाळ (भागवताचार्य, पुणे) यांचे श्री दत्त जन्म किर्तन होणार आहे. तर दि. ५ डिसेंबर रोजी त्यांचेच काल्याचे किर्तन होणार आहे. या ठिकाणी संगीत संयोजक म्हणून श्री विजयजी बागडे (मध्यप्रदेश) यांचे सहकार्य लाभले आहे. व्यासपीठ चालक म्हणून हभप आबा महाराज खेडेकर (बीड) आणि हभप दिनकर महाराज देवडकर (आळंदी देवाची) हे असणार आहेत.  फ्लेक्स सौजन्य – श्री शरदशेठ गडधे, श्री पिलूशेठ गडधे, श्री अनिलशेठ गडधे, श्री सोमनाथशेठ गडधे यांचे लाभले आहे.

असा आहे संपूर्ण सप्ताह कार्यक्रम –

शुक्रवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी मंगल चरण, श्री भागवत महात्म्य, गोकर्ण कथा.
शनिवार दि २९ रोजी श्री शुकदेव चरित्र, परीक्षित कथा,
रविवार दि. ३० रोजी कर्दम ऋषी, कपिलजी चारित्र्य,समुद्र मंथन, ध्रुव प्रल्हाद कथा,
सोमवार दि. १ डिसेंबर रोजी श्रीराम जन्म, श्रीकृष्ण जन्म,
मंगळवार दि. २ रोजी श्रीकृष्ण बाललिला, गोवर्धन पूजन,
बुधवार दि. ३ रोजी श्रीकृष्ण रुख्मिणी विवाह कथा,
गुरुवार दि. ४ रोजी सुदामा चरित्र, श्री दत्तांचे २४ गुरु, भगवंत निजधाम गमण, कवी महिमा, परीक्षिती निर्वाण, जलसिंपण विधी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सप्ताह कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दत्त सेवा मंडळ आणि बोरिपार्धी ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.