| सहकारनामा |
दौंड : बोरिपार्धी (ता.दौंड) गावठाणातील नागरिकांची घरोघरी जाउन आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
हा स्तुत्य उपक्रम बोरीपार्धी गावचे रहिवासी आणि पेशाने पोलीस हवालदार असणारे मल्हारी सोडनवर यांसह ग्रामपंचायत सदस्य अशोक आडसूळ, ग्रामपंचायत सदस्य शेखर सोडनवर यांच्या पुढाकाराने करण्यात येत असून आरोग्य तपासणीच्या या उपक्रमात बोरीपार्धी ग्रामीण आरोग्य उपकेंद्राचे डॉ.गणेश भगत, स्थानीक डॉ.प्रसाद खताळ, डॉ.स्वाती खताळ, डॉ.मनोज कोयचाटे, माने सर, आशा सेवीका रुक्मिणी नेवसे, सौ.सुरेखा पाटोळे, मीना नेवसे, अंगणवाडी सेविका नंदा कोकरे, वर्षा होळकर, मंगल ताडगे, उषा सोडनवर, राणी सोडनवर, नंदा शेडगे व दत्त सेवा मंडळाचे कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
तसेच बोरीपार्धी गावामध्ये नागरिकांसाठी कै.सुनंदा व कै.बापुराव भिकोबा ताडगे यांचे स्मरनार्थ प्रशांत व आशोक बापुराव ताडगे यांच्या वतीने मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पोलीस हवालदार मल्हारी सोडनवर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात असून रुग्णवाहिकेसाठी लागणारा सर्व खर्च दत्त सेवा मंडळाचे वतीने केला जात आहे. गावामध्ये ज्या लोकांची तपासणी केली जात आहे त्यांना काही लक्षणे दिसून आल्यास त्या नागरिकांची तपासणी करणेसाठी या रुग्णवाहीकेतून त्या संशयित रुग्णांना यवत येथे नेले जात आहे.