दौंड : गावखेडे, शहरांबरोबरच माणसांची मने साफ करण्याचे व्रत हाती घेतलेले श्री. संत गाडगे बाबा यांची 146 वी जयंती दौंड मध्ये साजरी करण्यात आली. यावेळी मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, बादशहा शेख, इंद्रजीत जगदाळे, शितल कटारिया तसेच पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी गाडगे बाबा यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहरातील सर्व पक्ष,संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक याप्रसंगी उपस्थित होते. दौंड पोलीस स्टेशन समोरील संविधान स्तंभ येथेही गाडगेबाबांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले, येथेही सर्व मान्यवरांनी गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्री संत गाडगे बाबा परीट सेवा समिती दौंड शहर व तालुका यांच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात आले.