बारामती : एका कंपनीत 5 लाख गुंतवून त्यातून दर महिन्याला 10 ते 15 टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले मात्र पैसे गुंतविल्यानंतर परतावा दिला नसल्याने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे विजय जंयत कुलकर्णी (वय 46 वर्ष, धंदा पुजा पाठ, रा. खंडोबानगर, बारामती, ता. बारामती, जि. पुणे) यांनी अखेर फिर्याद दिली आहे.
कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 1) मदन जहागिर पाडवी 2) वंदनादेवी मदन पाडवी (दोन्ही रा. अशोक नगर बारामती जि. पुणे) 3) सचिन डोंगरे 4) विकास निकम (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही, दोन्ही रा. पुणे) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 05/09/2023 ते 10/06/2024 रोजी पर्यन्त बारामती शहर खंडोबानगर येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरील आरोपिंनी दिनांक 05/09/2023 ते 10/06/2024 रोजी पर्यन्त बारामती शहर खंडोबानगर येथे फिर्यादीला जास्त परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडील पाच लाख रुपये (5,00,000/-) रुपये एस. पी.व्ही.एस. या कंपनीत गुतवणुक करण्यास लावून त्यावर महीना 5 ते 10 टक्के परतावा मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला.
मात्र पैसे दिल्यानंतर आरोपिंनी त्यांना परतावा न देता 1) मदन जहागिर पाडवी 2) वंदना देवी मदन पाडवी दोन्ही रा. अशोक नगर, बारामती, जि. पुणे. (3) सचिन डोंगरे (3) विकास निकम (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही.) यांनी फिर्यादी यांचा विश्वासघात करून त्यांची फसवणुक केली. त्यांच्या विरुध्द फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि प्रदीप भिताडे करीत आहेत.