दौंड : दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील एका घरातून चोरट्यांनी सुमारे 3 लाख 7 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत धैर्यशील विजय शितोळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 9 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देऊळगाव गाडा येथील शितोळे यांच्या राहते घराच्या उघड्या दरवाजातुन आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या कपाटातुन दागिने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या चोरीमध्ये 15 हजार रोख रक्कम, 1 लाख 57 हजार 500 रुपये किमतीचे 35.500 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 1 लाख 1 हजार 250 रुपये किमतीच्या 20.250 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या तसेच 3 हजार 750 रुपये किमतीचे पाऊण तोळ्याच्या कानातील सोन्याच्या रिंगा असा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करीत आहेत.