खा.‘सुप्रिया सुळे’ यांच्या टिकेनंतर ‘एकनाथ शिंदे’ झाले आक्रमक, घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

पुणे : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेचे (shivsena mla) अनेक आमदार गुवाहाटी (mla in guvahati) येथे स्थलांतरित केल्याने राज्यात सरकारची वाटचाल अस्थिरतेकडे होताना दिसत आहे. यातूनच महाविकास आघाडी सरकार (mva) आणि बंडखोर आमदार यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी नुकतीच बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली होती आणि आसाममध्ये पूरस्थिती असताना तिकडे पंचतारांकित हॉटेल्समध्ये मजा काय मारताय कमीत कमी तेथील लोकांची मदत तरी करा असा खोचक सल्ला त्यांना दिला होता.

सहकारनामा – खा.सुप्रिया सुळे यांची बंडखोर आमदारांवर टिका

खासदार सुप्रिया सुळे यांच्या टिकेला आज एकनाथ शिंदे यांनी आपल्या कृतीतून समर्पक उत्तर देताना दिसत असून त्यांनी आसाम मुख्यमंत्री निधित पूरग्रस्तांना 51 लाख रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.

सहकारनामा – एकनाथ शिंदे यांचे ट्वीट

राज्यात सध्या सत्तेत असलेले महाविकास आघाडीचेच सरकार राहणार की बंडखोर आमदारांच्या मदतीने भाजप चे सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून येत्या काही दिवसांतच चित्र स्पष्ट होणार आहे.