नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थकांसाठी आनंदाची बातमी आहे. केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने दिल्लीमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे. न्यायालयाने केजरीवालांचा अंतरिम जामीन मंजूर केला असल्याने ऐन निवडणुकीमध्ये केजरीवाल बाहेर येणार असल्याने भाजपला हा मोठा धक्का समजला जात आहे.