Daund – दौंड शहरामध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन, केंद्र सरकारचा नोंदविला निषेध



|सहकारनामा|

दौंड : दौंड शहर काँग्रेस कमिटी व दौंड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने देशातील इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. शहरातील पेट्रोल पंपावरील आंदोलना दरम्यान आंदोलन कर्त्यांनी केंद्र सरकार व नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा दिल्या, पंपावर इंधन भरावयास आलेल्या ग्राहकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनामध्ये सहभाग घेऊन इंधन दरवाढ रोखू न शकणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध केला. 

आंदोलनावेळी पक्षाचे शहराध्यक्ष हरेश ओझा, उपाध्यक्ष महेश जगदाळे, युवक तालुका अध्यक्ष अतुल जगदाळे, तन्मय पवार,जॉनी शेख, विठ्ठल शिपलकर, अतिश जगताप आदि उपस्थित होते.