|सहकारनामा|
दौंड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कामाची दखल घेत दौंड तालुक्यातील भाजपा अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर व शिवसेना शहर प्रमुख आनंद पळसे यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला (ता.दौंड) येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला येथे झालेल्या प्रवेशावेळी जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शोएब शेख, हाजी रफिक मन्यार यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेना दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, उपशहर प्रमुख प्रसाद कदम, शिवसेना विभाग प्रमुख सतीश आटोळे, शिवसेनेचे माऊली आहेर, प्रशांत जगताप,चांदबादशहा शेख, शिवाजी मोरे, कुंडलिक चुंबळकर, शुभम माळवे व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थितीत होते.