Daund : केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रयत क्रांती संघटनेचे आंदोलन



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

आज रयत क्रांती संघटनेतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड उपबाजार केडगाव, येथे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी पुकारलेले प्रतीआंदोलन करण्यात आले.  यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे, पुणे जिल्हा सरचिटणीस सयाजी मोरे, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अनिता ताकवणे, दौंड तालुका अध्यक्ष संतोष गोलांडे व शेतकरी प्रकाश ताकवणे उपस्थित होते. 

बाजार समितीचे अध्यक्ष यांनी नियमन मुक्ती विरोधात आंदोलन पुकारले होते. नियमन मुक्ती विरोधात पुकारलेल्या आंदोलनाच्या विरोधात रयत क्रांती संघटनेने प्रति आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. 

यावेळी भानुदास शिंदे यांनी बोलताना एक देश एक बाजारपेठ शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कोठेही विकण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. केंद्र शासनाने नियमन करून व बाजारपेठेचे स्वातंत्र्य देऊन शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. बाजारपेठेचे स्वातंत्र्यतिची मागणी शेतकरी संघटनांची जुनी होती.

त्याचप्रमाणे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या काळात महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भाजीपाला व फळे नियमन मुक्त केले. त्यानंतर सर्व शेतीमाल नियमन मुक्ती करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यावेळेस विरोध झाला त्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्र शासनाशी पत्रव्यवहार करून व पाठपुरावा करून कायदा पास करून घेतला. परंतु काही मंडळी या नियम मुक्तीचा अर्थ चुकीचा काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. हा कायदा शेतकरी हिताचा असून, संघटनेचा कायद्याला पाठिंबा असून सदर कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी यासाठी सुद्धा संघटनेने आंदोलन केले आहे.

नियमन मुक्तीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात प्रतीआंदोलन केले.

 कारण मार्केट कमिटी बाजार समित्या असताना सुद्धा अनेक वर्षे आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने व्यापारी शेतीमाल खरेदी करत होते. या विषयाकडे मार्केट कमिटी सोयीस्कर दुर्लक्ष करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत होता. आता शेतीमाल खरेदीची स्पर्धा वाढून शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल अशी संघटनेची भूमिका आहे.