दौंड : दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे जावयाने आपल्या सासरवाडीत कटर च्या सहाय्याने आपला गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत प्रमोद तुळशीराम शेलार (रा. गलांडवाडी ता.दौंड, जि. पुणे) यांनी खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.२४ जुलै रोजी रात्री २ वाजता त्यांना त्यांच्या घरालगत असलेल्या खोलीत खडबड खडबड अवाज येत होता. त्यामुळे फिर्यादी यांचे वडील तुळशिराम शेलार हे कसला आवाज येत आहे पाहण्यासाठी गेले असता त्यांना माझे फिर्यादी यांचे दाजी विपुल रमेश गदरे यांनी ग्राइंडर च्या सहयाने गळा कापला असल्याचे व ते रक्ताच्या थारोळयात पडले असल्याचे दिसल्याने त्यांनी घरातील इतर लोकांना उठवले.
त्यानंतर या सर्वांनी घरा शेजारी असणाऱ्या लोकांना उठवुन सदरचा प्रकार सांगितला. त्यावेळी यवत पोलीसांना लोकांनी फोन करून माहिती दिल्यानंतर तेथे आलेल्या यवत पोलीसांच्या मदतीने फिर्यादी यांचे दाजी विपुल गदरे यांना अॅम्ब्युलन्स मधुन यवत ग्रामीन रूग्णालय घेऊन जाण्यात आले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी गदरे यांना तपासुन उपचारपुर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
फिर्यादी यांच्या खबरीवरून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मदने हे अधिक तपास करीत आहेत.